Log In
Home
Pranjal
ती - एक अपूर्ण व्याख्या
ARTICLE

ती - एक अपूर्ण व्याख्या

जगाने तिच्यावर नेहमी नावं ठेवली, पण तिच्या मौनात किती मोठं आकाश दडलंय हे कुणीच पाहिलं नाही.
Pranjal
October 4, 2026 · 1 min read · 7 views
Cover image for "ती - एक अपूर्ण व्याख्या"

तिला समजून घेणं कधी सोपं नव्हतं.

ती जास्त बोलली तर लोक म्हणतात उद्धट आहे, आणि कमी बोलली तर म्हणतात गर्विष्ठ आहे. ती हसली तर म्हणतात नखरेबाज आहे, आणि ती रडली तर म्हणतात नाटक करते.

तिचं आयुष्य म्हणजे काय? लहानपणापासून तिला शिकवलं जातं - जपून राहा, जपून बोल, जपून चाल. प्रत्येक पावलावर तिला तिच्या मर्यादेची जाणीव करून दिली जाते.

पुढे जाण्याची स्वप्नं तिचीही असतात. तिलाही आकाशाला गवसणी घालायची असते. पण ती पुढे गेली तर समाज तिच्या चारित्र्यावर बोट ठेवतो, आणि ती मागे राहिली तर तिलाच अडाणी ठरवतो.

खरं तर ती कुणाच्याही व्याख्येत बसत नाही. ती कधी आई होते, कधी बहीण, कधी मैत्रीण, कधी पत्नी. प्रत्येक भूमिकेत ती स्वतःला विसरून दुसऱ्यासाठी जगते.

तिचं मौन सुद्धा खूप काही सांगून जातं. तिच्या त्या शांततेत एक वादळ दडलेलं असतं, एक सहनशीलता असते आणि एक न संपणारी ताकद असते.

जग तिला नावं ठेवत राहील, पण ती तिच्या वाटेवर चालत राहते. कारण तिला माहिती आहे, तिचं अस्तित्व कुणाच्या प्रमाणपत्रावर नाही, तर तिच्या स्वतःच्या लढाईवर उभं आहे.

ती फक्त एक स्त्री नाही, ती एक संपूर्ण विश्व आहे.

4
Written by
Pranjal
Follow

Comments

Because every thought is worth quoting.
Get a good quote in your inbox, weekly
Subscribe
About
·
Privacy Policy
·
Contact
·
Careers
·
RSS Feed
© 2026 Quotethought
Home
Search
Alerts
Profile
You're offline — some content may not load
A new version is available — tap to refresh