Log In
Home
Pranjal
मोठं झाल्यावर कळलेल्या ४ गोष्टी
ARTICLE

मोठं झाल्यावर कळलेल्या ४ गोष्टी

लहानपणी वाटायचं मोठं होऊ, पण मोठं झाल्यावर कळलं लहानपणच भारी होतं
Pranjal
September 26, 2026 · 1 min read · 1 views
Cover image for "मोठं झाल्यावर कळलेल्या ४ गोष्टी"

मोठं झाल्यावर कळलेल्या ४ गोष्टी

लहानपणी आपल्याला नेहमी वाटतं की आपण लवकर मोठं व्हावं. पण मोठं झाल्यावरच कळतं की लहानपण किती भारी होतं.

१. मोठं होणं म्हणजे एकटं होणं

मला वाटायचं मोठं झाल्यावर सगळं सोपं होईल. पण आता कळलं, संध्याकाळी घरी गेल्यावर "आजचा दिवस कसा होता?" असं विचारणारं कोणीच नसतं. आपण मोठे होतो तसे एकटे पण होत जातो.

२. अभ्यासाचा त्रास काहीच नव्हता

आई बाबा म्हणायचे अभ्यास कर म्हणजे पुढे त्रास होणार नाही. तेव्हा त्यांचा राग यायचा. पण आता कळतंय, खरा त्रास अभ्यासाचा नव्हताच. खरा त्रास तर आता आहे, जेव्हा आपल्याला काय करायचंय हेच कळत नाही.

३. घर म्हणजे भिंती नसतात

आमच्या घरात आधी खूप आवाज असायचा. आईची भांडी, बाबांचा टीव्ही, आपलं हसणं. आता घरात सगळ्या वस्तू आहेत पण तो आवाज नाहीये. तेव्हाच कळलं, घर हे भिंतींनी नाही तर त्या आवाजाने बनतं.

४. तो हसणारा मुलगा हरवला

मी जेव्हा माझ्या जुन्या फोटोंकडे बघतो तेव्हा वाटतं, हा हसणारा मुलगा कुठे गेला? त्याला कसलीच काळजी नव्हती. त्याला फक्त उद्या शाळेला सुट्टी हवी असायची. आणि आज मला फक्त परत लहान व्हायचंय.

मोठं होणं वाईट नाहीये, पण लहानपणीचे दिवस परत येणार नाहीत हेच खरं आहे.

3
Written by
Pranjal
Follow

Comments

Because every thought is worth quoting.
Get a good quote in your inbox, weekly
Subscribe
About
·
Privacy Policy
·
Contact
·
Careers
·
RSS Feed
© 2026 Quotethought
Home
Search
Alerts
Profile
You're offline — some content may not load
A new version is available — tap to refresh