Log In
Home
Pranjal
आयुष्यात शांत राहण्याची कला कोणीच शिकवत नाही
ARTICLE

आयुष्यात शांत राहण्याची कला कोणीच शिकवत नाही

पैसा सगळं देतो पण मनाची शांती देत नाही, खरी शांतता कशी मिळवायची ते वाचा.
Pranjal
October 2, 2026 · 1 min read · 8 views

आयुष्यात सगळी धावपळ पैशासाठी असते असं आपल्याला वाटतं, पण खरं सांगू का? पैसा आला तरी शांतता विकत घेता येत नाही.

आजकाल प्रत्येक जण दुसऱ्यापेक्षा पुढे जायच्या नादात स्वतःलाच विसरून गेला आहे. Instagram वर दुसऱ्याचं सुख पाहून आपण आपलं दुःख मोठं करतो.

मी एक गोष्ट शिकलो, शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही. शांत राहणं म्हणजे स्वतःला जिंकणं आहे.

जेव्हा कोणी तुला कमी लेखतं, तेव्हा भांडू नकोस. शांत रहा. तुझं काम एवढं मोठं कर की त्यांना टाळ्या वाजवाव्याच लागतील.

३ गोष्टी नेहमी लक्षात ठेव:

१. बोलणं कमी, काम जास्त - जगाला तुझा plan सांगू नकोस, result दाखव.

२. तुलना बंद - तुझी स्पर्धा फक्त कालच्या तुझ्याशी आहे, दुसऱ्या कोणाशी नाही.

३. स्वतःसाठी वेळ - दिवसातले 30 मिनिट फक्त स्वतःसाठी ठेव. ना मोबाईल, ना मित्र. फक्त तू आणि तुझे विचार.

शेवटी काय, लोक काय म्हणतील याचा विचार करून जगला तर तू कधीच जगणार नाहीस. तुझं आयुष्य सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे.

तुला काय वाटतं? तू शेवटचं स्वतःसाठी कधी वेळ काढला होतास?

3
Written by
Pranjal
Follow

Comments

Because every thought is worth quoting.
Get a good quote in your inbox, weekly
Subscribe
About
·
Privacy Policy
·
Contact
·
Careers
·
RSS Feed
© 2026 Quotethought
Home
Search
Alerts
Profile
You're offline — some content may not load
A new version is available — tap to refresh